बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

क्रेडाईच्या गृहप्रदर्शनाला मोठा प्रतिसाद; पहिल्या दोन दिवसातच ८० घरांचे बुकींग

by India Darpan
नोव्हेंबर 25, 2022 | 7:27 pm
in स्थानिक बातम्या
0
प्रदर्शनास भेट देण्यासाठी उत्स्फूर्त गर्दी

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोविड नंतर मोठ्या घरांच्या मागणी मध्ये झालेली वाढ तसेच नाशिक मध्ये भविष्यात येऊ घातलेल्या अनेक व्यवसाय व उद्योग संधी मुळे नाशिक मध्ये रियल इस्टेट मध्ये गुंतवणुकीचा कल वाढला असल्याचे दृश्य क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित शेल्टर् 2022 या गृह प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसात दिसून येत आहे. पहिल्या दोनच दिवसात प्रदर्शनात सुमारे 15000 हून अधिक दर्शकानी भेट दिली असून 80 फ्लॅट्स ची नोंदणी झाली असून उद्या शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांचे औचित्य साधून अनेकांनी साईट विझिट चे नियोजन देखील केले आहे . अर्थव्यवस्था पूर्व पदावर येत असल्याचे हे चांगले संकेत असल्याचे प्रतिपादन क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवी महाजन यांनी केले.

आज सुट्टीचा दिवस नसून देखील असंख्य नाशिककर तसेच अन्य शहरे जसे धुळे , नंदुरबार , जळगाव , ठाणे , औरंगाबाद येथून देखील दर्शक प्रदर्शन बघण्यासाठी येत असून विचार समृद्धीचा .. पत्ता नाशिकचा’ नाशिक नेक्स्ट’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात भविष्यातील नाशिक कसे असेल याचा अनुभव घेत आहे . असेही त्यांनी नमूद केले. बांधकाम उद्योगास देशाच्या जी डी पी मध्ये महत्वाचे स्थान असून प्रत्येक शहरातील अर्थचक्र फिरण्यामध्ये देखील बांधकाम उद्योगाची मोलाची भूमिका आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तसेच कुशल आणि अकुशल प्रकारचा रोजगार देखील बांधकाम व्यवसायातून उपलब्ध होतो. त्यामुळे 100 हून अधिक बिल्डर यांचे ५०० हून अधिक प्रकल्प एकच छताखाली उपलब्ध असलेल्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकूणच शहराचे अर्थचक्र फिरण्यास गती मिळेल असा विश्वास प्रदर्शनाचे समन्वयक कृणाल पाटील यांनी व्यक्त केला ..

सदनिकांशिवय बांधकाम साहित्य , इंटेरिअर साठी लागणारे विविध साहित्य तसेच इतर संबंधित व्यवसाय , आघाडीच्या गृह कर्ज देणाऱ्या संस्था आणि बँकां चे स्टॉल्स देखील येथे आहेत शहराचा उत्सव असलेल्या या प्रदर्शनात हॅप्पी स्ट्रीट मधील स्थानिक कलाकारांचे सादरीकरणाने आलेल्या दर्शकांचे मनोरंजन केले. या निमित्ताने स्थानिक कलावंतांना कला गुण प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले आहे.. व्यवसाय शिवाय अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे शेल्टर मध्ये देखील अनेक सामाजिक संस्थांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहे .

प्रदर्शनास मोफत प्रवेश
शेल्टर प्रदर्शनास भेट देण्यासाठी दर्शकांना ऑनलाईन नोंदणी केल्यास मोफत प्रवेश देण्याचे क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे जाहीर करण्यात आले आहे. या साठी फक्त क्यु आर कोड स्कॅन करून आपली माहिती भरल्यास एन्ट्री पास त्या दर्शकाच्या मेल वर येईल . या आधी अश्या ऑनलाईन नोंदणीची मुदत २१ नोव्हेंबर पर्यंत होती पण त्याची मागणी बघता ही मुदत प्रदर्शन कालावधीपर्यंत म्हणजे २८ नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. डिजिटल इंडिया च्या प्रवासात खारीचा वाटा तसेच दर्शकांना भेट प्रदर्शनास भेट देणे अधिक सुकर व्हावे या साठी म्हणून क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रदर्शनास भेट देणाऱ्या दर्शकातून रोज काही भाग्यवंत लकी ड्रॉ द्वारे निवडले जातात. 24 तारखेच्या लकी ड्रॉ चे भाग्यवान विजेते असे
1) राजा शेख – सोनाली पैठणी व डिनर सेट
2) सुमित चौधरी -मुहूर्त डिझायनर स्टुडिओ गिफ्ट व्हॉउचर व एमराल्ड पार्कचे फूड कुपन
3) प्रफुल्ल पाटील -मयूर अलंकार तर्फे 1 ग्रॅम सोन्याचे नाणे व एमराल्ड पार्कचे फूड कुपन
4) प्रतिक देवरे – सोनाली पैठणी व डिनर सेट
5) योगेश लोखंडे -मयूर अलंकार तर्फे 1 ग्रॅम सोन्याचे नाणे व एमराल्ड पार्कचे फूड कुपन

शेल्टर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर , राष्ट्रीय क्रेडाईचे समिती प्रमुख [ घटना ] जितुभाई ठक्कर , महाराष्ट्र क्रेडाई चे सचिव सुनील कोतवाल तसेच माजी अध्यक्ष किरण चव्हाण , सुरेश पाटील , नेमीचंद पोतदार , उमेश वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभत असून क्रेडाई नाशिक मेट्रो चे मानद सचिव गौरव ठक्कर , कोषाध्यक्ष हितेश पोतदार , सहसचिव अनिल आहेर, सहसचिव सचिन बागड तसेच कमिटी सदस्य नरेंद्र कुलकर्णी , नितीन पाटील, मनोज खिवंसरा , अंजन भालोदिया, अतुल शिंदे, सुशील बागड, राजेश आहेर, हर्षल देशमुख, श्रेणिक सुराणा, नरेंद्र कुलकणी, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके हे कार्यरत आहेत

Nashik Credai Exhibition 80 Homes Booking Response

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये सुरू होणार आणखी १५ सीएनजी पंप; २५ हजार घरांमध्ये पीएनजी गॅसही मिळणार

Next Post

सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा परिसरात सशस्त्र दरोडा; हातपाय सेलोटेपने बांधले

India Darpan

Next Post
crime 6

सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा परिसरात सशस्त्र दरोडा; हातपाय सेलोटेपने बांधले

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011