मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये सुरू होणार आणखी १५ सीएनजी पंप; २५ हजार घरांमध्ये पीएनजी गॅसही मिळणार

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे नाशिक व परिसरात पुढील सहा महिन्यांचे नियोजन शहरी गॅस वितरण व्यवस्थेचा विस्तार

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 25, 2022 | 7:04 pm
in स्थानिक बातम्या
0
CNG Gas

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहर व परिसरात गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक व स्वच्छ ज्वलनशील अशा कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) या स्वरूपात नैसर्गिक वायू मिळत असून लवकरच या वितरण व्यवस्थेचा जिल्ह्यात\अधिक विस्तार होत आहे. सद्यस्थितीत कंपनीच्या नाशिक परिसरात एकण २० सीएनजी पंप आहेत. पुढील सहा महिन्यात यात आणखी १५ पंपांची वाढ होणार आहे. तर, शहरातील एकूण १५०० घरांमध्ये पीएनजी गॅसची सेवा सुरू झाली आहे. येत्या सहा महिन्यात ही संख्या थेट २५ हजारांवर जाणार आहे.

नाशिक आणि आसपासच्या भौगोलिक भागात सीएनजी ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी एमएनजीएल अधिकाधिक सीएनजी स्टेशन स्थापित करत आहे आणि सोबतच स्टील पाईपलाईनचा विस्तार करण्याचे काम सात्यत्याने चालू आहे. सीएनजी स्टेशनच्या विस्तारामुळे ही वाढती मागणी पूर्ण करण्यात मदत होईल आणि नाशिकच्या भौगोलिक क्षेत्रामधील लोकांना हरित आणि स्वच्छ इंधनाकडे वळण्यास मदत होईल.

नाशिक व आजूबाजूच्या भौगोलिक परिसराला सीएनजी व पीएनजी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) या कंपनीने याबाबत योजना आखली आहे. आजमितीला, एमएनजीएल सुमारे 20 सीएनजी स्टेशन द्वारे नाशिक आणि आसपासच्या भागात सुमारे 7,000 वाहनांना सीएनजी पुरवठा करीत आहे. यामध्ये ऑनलाइन सीएनजी स्टेशन्सचा समावेश आहे ज्यातून नागरिकांना व सीएनजी वापरकर्त्यांना अखंडित सीएनजी पुरवठा केला जात आहे.

एमएनजीएलने नाशिक भौगोलिक क्षेत्रात पंधराहून अधिक उद्योग आणि व्यावसायिक ग्राहकांसह घरगुती ग्राहकांना पीएनजी पुरवठा सुरू केला आहे. नाशिक भौगोलिक क्षेत्रामध्ये कंपनीने सुमारे 300हून अधिक किलोमीटरचे स्टील आणि मध्यम दाबाचे पाइपलाइन नेटवर्क तयार केले आहे. एमएनजीएलने 2019 मध्ये नाशिक आणि जवळपासच्या क्षेत्रामध्ये शहरी गॅस वितरणाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली.

नाशिकच्या जवळपास कोणतीही नैसर्गिक वायू पाइपलाइन कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे कंपनीने सीएनजी पुण्यातून कॅस्केडद्वारे गाड्यांमधून ट्रान्सपोर्ट करू नाशिकमध्ये वितरण करण्यास सुरु केली. सध्या गेल (इंडिया) लिमिटेड मुंबई-नागपूर-झारसुगुडा या मार्गावर नैसर्गिक वायू पाईपलाइन प्रकल्प विकसित करत आहे जो नाशिक जिल्ह्यातून जाणार असून आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये तो कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर, नाशिक-धुळे भौगोलिक क्षेत्रामध्ये पाइपलाइन कनेक्टिव्हिटी नसल्याने एमएनजीएलने’ एलएनजी’ स्टेशन उभारण्याच्या व्यवहार्यतेची तपासणी करून, एलएनजी स्टेशन एस्टॅब्लिश केले आहे.

कंपनी द्वारे गुजरातमधील’दहेज एलएनजी टर्मिनल’हून एलएनजी नाशिकला ट्रान्सपोर्ट करून त्याचे री-गॅसिफिकेशन करण्यात येते. त्यानंतर वाहनांसाठी सीएनजी तसेच नाशिक विभागातील औद्योगिक, व्यावसायिक आणि घरगुती विभागांसाठी पीएनजी वितरित केला जातो. ही एलएनजी सुविधा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पाथर्डी, नाशिक येथे आहे. एमएनजीएलचे हे एलएनजी स्टेशन भारतातील प्रमुख अत्याधुनिक सुविधांपैकी एक आहे. आज, कंपनी प्रतिदिन सुमारे 1 लाख क्युबिक मीटर नैसर्गिक वायूचे वितरण या एलएनजीसुविधेद्वारे करीत असून त्यातून नाशिक भागातील सीएनजी व घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक वापराकरिता असलेल्या मागणीचा पुरवठा केला जात आहे‌.

आज नाशिक महापालिका परिवहनच्या सुमारे 200 बसेस सीएनजीवर धावत आहेत. सध्या अंबड एमआयडीसी, पाथर्डी फाटा, सातपूर, इंदिरानगर, बिटकोरोड, नाशिकरोड, जेलरोड, सोमेश्वररोड, अंबड-सातपूररोड, सोमेश्वररोड, सिन्नर, इगतपुरी आदी भागात सीएनजी आणि पीएनजी पुरवठा करत आहे. चांदवड परिसरातही पायाभूत सुविधांचा विकास सुरू आहे. त्याचप्रमाणे, एमएनजीएल नवीन भौगोलिक क्षेत्रांमध्ये नांदेड, बुलढाणा, परभणी इत्यादी जिल्हे तर तेलंगाणातील निजामाबाद, आदिलाबाद, निर्मल, मांचेरिअल, कुमुरम – भीम – आसिफाबाद, कामारेड्डी इत्यादी जिल्ह्यांत प्रवेश करीत आहे.

Nashik CNG Pump Station and PNG Service

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सातारा जिल्ह्यात पाचशे एकरावर कृषी उद्योग उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Next Post

क्रेडाईच्या गृहप्रदर्शनाला मोठा प्रतिसाद; पहिल्या दोन दिवसातच ८० घरांचे बुकींग

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
प्रदर्शनास भेट देण्यासाठी उत्स्फूर्त गर्दी

क्रेडाईच्या गृहप्रदर्शनाला मोठा प्रतिसाद; पहिल्या दोन दिवसातच ८० घरांचे बुकींग

ताज्या बातम्या

Untitled 22

घटना मीरा रोडमध्ये, मोर्चासाठी घोडबंदर रोडचा मार्ग सुचवला…मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवर मनसेचे उत्तर

जुलै 8, 2025
Untitled 22

मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली, वातावरण तापलं

जुलै 8, 2025
GvQZks6WwAArk6Q

पुणे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना…काँग्रेसने धरणे आंदोलन करत व्यक्त केला संताप

जुलै 8, 2025
Untitled 21

बनावट जीआरच्या आधारे तब्बल ७ कोटी रुपयांची विविध विकासकामे….नेमकं घडलं काय

जुलै 8, 2025
Untitled 20

मंत्री संजय शिससाट यांच्या अडचणीत वाढ…मुख्यमंत्री फडणवीस यांनी विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी लावली

जुलै 8, 2025
kanda onion

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011