नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीत भरधाव दुचाकी घसरल्याने ३५ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. विशाल श्रावण सोनवणे (रा.म्हाडा कॉलनी,जाधव संकुल) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. सोनवणे गेल्या सोमवारी (दि.६) महालक्ष्मीनगर येथून औद्योगीक वसाहतीच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. कॉन्टीनेटर महिंद्रा सीटी कंपनी भागात भरधाव दुचाकी घसरल्याने ते पडले होते. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता शुक्रवारी उपचार सुरू असतांना डॉ.प्राजक्ता दाते यांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक टिळेकर करीत आहेत.