नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बेकायदा मद्यविक्री करणा-या परप्रांतीयास पोलिसांनी गजाआड केले आहे. मखमलाबाद शिवारातील एका हॉटेल परिसरात पोलिसांनी संशयिताच्या ताब्यातून १ हजार ६९५ रूपये किमतीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगत हरिनाम वर्मा (२५ मुळ रा.लखनऊ उत्तरप्रदेश) असे संशयित मद्यविक्रेत्याचे नाव आहे. हॉटेल आम्रपाली भागात बेकायदा मद्यविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.९) रात्री सापळा लावला असता संशयित पोलिसांच्या जाळयात अडकला. त्याच्या ताब्यातून देशी विदेशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस नाईक योगेश देसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक पगारे करीत आहेत.