नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुने नाशिक परिसरात जुगार खेळणा-या चौघांच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओशवेदांत भिमराव जाधव (२६ रा.धम्मनगर,गंजमाळ),मुज्जफर आयुब शेख (२३ रा.नानावली),नवाज रइस शेख (३५ रा.अमरधामरोड कथडा) व नाजीम इस्माईल शेख (४४ रा.नाईकवाडापुरा) अशी संशयित जुगारींची नावे आहेत. कथडा भागातील सार्वजनिक शौचालय भागात काही तरूण उघड्यावर जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.७) सायंकाळी धाव घेत पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या. पत्यांच्या कॅटवर संशयित पैसे लावून तीन पत्ती जुगार खेळत होते. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी अंमलदार सागर निकुंभ यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलिस नाईक ठेपणे करीत आहेत.