India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सातपूरमध्ये कारच्या काचा फोडणारा गजाआड; असा गवसला नाशिक पोलिसांना

India Darpan by India Darpan
January 19, 2023
in स्थानिक बातम्या
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एमएचबी कॉलनीत सातहून अधिक पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडणा-याला पोलिसांनी गजाआड केले. पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे संशयितास अटक केली. आकाश निवृत्ती जगताप (२१ रा.एमएचबी कॉलनी, सातपूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली.

सोमवारी मध्यरात्री नंतर एमएचबी कॉलनीत घरासमोर पार्क केलेल्या चारचाकी वाहनांना लक्ष करीत अज्ञातांनी काचा फोडल्या होत्या. या घटनेत सातहून अधिक कारच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले होते. त्यात रविंद्र सगरे यांच्या एमएच १५ ईबी ३७३० आणि रूबी आलमशहा (रा.सातपूर कॉलनी) यांच्या एमएच १५ डीएम १४६५ या कारचाही समावेश होता. सकाळच्या सुमारास ही बाब निदर्शनास आल्याने वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली होती. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेची पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेत माथेफिरूस हुडकून काढण्याचे आदेश दिल्याने पोलिस यंत्रणा कामाला लागली होती.

सातपूर पोलिसांसह युनिट २ चे पथक परिसरातील सीसीटिव्हीच्या आधारे भामट्यांचा शोध घेत असतांना हवालदार राजेंद्र घुमरे आणि संजय सानप यांनी केलेल्या निरीक्षणाच्या माध्यमातून संशयितास ताब्यात घेतले असता त्याने गुह्याची कबुली दिली. संशयितास सातपूर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले असून ही कारवाई निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पोपट कारवाळ, जमादार यशवंत बेंडकोळी, राजेंद्र घुमरे, सुनिल आहेर, प्रशांत वालझाडे, संतोष ठाकूर आदींच्या पथकाने केली.


Previous Post

दिवाणी न्यायाधीश परिक्षेत नायगावच्या कीर्ती कातकाडे यांनी मिळवला राज्यात ३५ वा रँक

Next Post

अंबानींच्या कुटुंबातील अनंत आणि राधिकाचा असा झाला साखरपुडा

Next Post

अंबानींच्या कुटुंबातील अनंत आणि राधिकाचा असा झाला साखरपुडा

ताज्या बातम्या

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र

बँकेचा चेक देताना चार वेळा विचार करा! बाऊन्स झाला तर आता होणार ही कठोर कारवाई

January 28, 2023

गर्लफ्रेंडने तुडवले, कंपनीनेही दूर लोटले! ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्कची जगभरात जोरदार चर्चा

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group