India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अंबानींच्या कुटुंबातील अनंत आणि राधिकाचा असा झाला साखरपुडा

गोल-धना आणि चुनरीच्या समारंभानंतर दोघांनीही एकमेकांना अंगठ्या घातल्या

India Darpan by India Darpan
January 19, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांनी आज कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत पूर्णतः पारंपरिक विधींनी साखरपुडा संपन्न झाला मुंबईतील अंबानी निवासस्थानी हा सोहळा पार पडला. गुजराथी हिंदू कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोल-धना आणि चुनरी विधी यांसारख्या शतकानुशतके जुन्या परंपरा कार्यक्रमस्थळ आणि कौटुंबिक मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडल्या. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना भेटवस्तू दिल्या. अनंतची आई श्रीमती नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली अंबानी कुटुंबातील सदस्यांनी केलेले नृत्य हे कार्यक्रमाचे आकर्षण होते.

गोल-धनाचा शाब्दिक अर्थ आहे गूळ आणि धणे – गोल-धणा हा गुजराती परंपरांमध्ये लग्नापूर्वीचा समारंभ आहे. कार्यक्रमादरम्यान या वस्तू वराच्या घरी पोहोचवल्या जातात. वधूचे कुटुंब वराच्या घरी भेटवस्तू आणि मिठाई आणतात आणि नंतर जोडपे अंगठ्याची देवाणघेवाण करतात. यानंतर हे जोडपे आपल्या वडिलांकडून आशीर्वाद घेतात.
अनंतची बहीण ईशा आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी प्रथम राधिकाला आणि मर्चंट कटुंबियाना त्यांच्या निवासस्थानी जाऊन संध्याकाळच्या उत्सवासाठी आमंत्रित केले. यानंतर, अंबानी कुटुंबाने वधू पक्षाचे त्यांच्या निवासस्थानी आरती आणि मंत्रोच्चारात स्वागत केले.

संपूर्ण कुटुंब अनंत आणि राधिकासोबत या जोडप्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी भगवान कृष्णाचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात गेले. तेथून सर्वजण गणेश पूजनाच्या ठिकाणी रवाना झाले आणि त्यानंतर पारंपरिक लगन पत्रिका पठण झाले. गोल-धना आणि चुनरी समारंभानंतर अनंत आणि राधिकाच्या कुटुंबांमध्ये भेटवस्तूंची देवाणघेवाण झाली. श्रीमती नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखालील अंबानी कुटुंबातील सदस्यांनी एक जबरदस्त आणि आकर्षक नृत्य सादरीकरन केले ज्याला उपस्थित लोकांच्या टाळ्या मिळाल्या.

बहीण ईशाने रिंग सोहळ्याची घोषणा करताच अनंत आणि राधिकाने कुटुंब आणि मित्रांसोबत रिंग्जची देवाणघेवाण केली आनि सर्वांचे आशीर्वाद घेतले. अनंत आणि राधिका आता काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत आणि आजच्या एंगेजमेंट विधी नंतर उभयता वैवाहिक जीवनाच्या दिशेने अजून जवळ येतील. दोन्ही कुटुंबानी राधिका आणि अनंतसाठी सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा घेतल्या

नीता आणि मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत यांनी अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केले आणि तेव्हापासून ते रिलायन्स इंडस्ट्रीजशी विविध पदांवर कार्यरत आहेत. ते जिओ प्लॅटफॉर्म्स आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या संचालक मंडळावर आहेत. ते सध्या रिलायन्सच्या ऊर्जा व्यवसायाचे प्रमुख आहेत. राधिका, शैला आणि वीरेन मर्चंट यांची मुलगी, न्यूयॉर्क विद्यापीठाची पदवीधर आहे आणि एनकोर हेल्थकेअरच्या बोर्डावर संचालक म्हणून काम करते.

Anant Ambani and Radhika Merchant Engagement Ceremony


Previous Post

सातपूरमध्ये कारच्या काचा फोडणारा गजाआड; असा गवसला नाशिक पोलिसांना

Next Post

पंतप्रधान मोदींनी फुंकले मुंबई महापालिकेचे रणशिंग; मुंबईकरांना घातली ही साद, हे आहेत मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Next Post

पंतप्रधान मोदींनी फुंकले मुंबई महापालिकेचे रणशिंग; मुंबईकरांना घातली ही साद, हे आहेत मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group