India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

दिवाणी न्यायाधीश परिक्षेत नायगावच्या कीर्ती कातकाडे यांनी मिळवला राज्यात ३५ वा रँक

India Darpan by India Darpan
January 19, 2023
in स्थानिक बातम्या
0

सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने २०२१ मध्ये घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परिक्षेत नायगाव येथील अॅड. कीर्ती शिवाजीराव कातकाडे यांनी यश संपादन केले आहे. त्यांनी राज्यात ३५ वा रँक मिळवला. या यशाने नायगाव खोऱ्यासह सिन्नरच्या शिरपेचात नवा तुरा खोवला गेला आहे.

अॅड. कीर्ती कातकाडे यांनी २००८ मध्ये बी. फार्मसी, २०११ मध्ये एम.बी.ए., २०१४ मध्ये एल.एल.बी., तर २०२२ मध्ये एल.एल.एम.चा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेत यश मिळविले आहे. या पदाच्या एकूण ६३ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यात कीर्ती यांनी ३५ वा रँक मिळविला. कीर्ती या नायगाव येथील एसएसके धनलक्ष्मी नागरी पतसंस्थेचे संस्थापक स्व. शिवाजीराव कातकाडे यांच्या कन्या तसेच संस्थेचे विद्यमान चेअरमन संग्राम कातकाडे यांच्या भगिनी आहेत. त्यांच्या यशाबद्दल सिन्नर तालु्नयासह नाशिक जिल्ह्यातून कौतूक होत आहे.

तर आनंद द्विगणित झाला असता
स्पर्धा परीक्षेसाठी आई-वडील व कुटूंबाकडून प्रेरणा मिळाली. प्रामाणिक प्रयत्न व अभ्यासात सातत्य असल्यास यश नक्कीच मिळते. वडील स्व. शिवाजीराव कातकाडे यांनी दिलेल्या संस्कारांची शिदोरी खऱ्या अर्थाने या यशाचे गमक आहे. दीड वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले. मुलगी म्हणून मी स्वत:चे अस्तित्व निर्माण करावे ही त्यांची इच्छा होती. हे यश बघायला स्व. दादा आमच्यात असते तर आनंद द्विगणित झाला असता.
– अॅड. कीर्ती शिवाजीराव कातकाडे


Previous Post

धक्कादायक! दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षच असुरक्षित; कारचालकाने काढली छेड… बघा, नेमकं काय घडलं? (व्हिडिओ)

Next Post

सातपूरमध्ये कारच्या काचा फोडणारा गजाआड; असा गवसला नाशिक पोलिसांना

Next Post

सातपूरमध्ये कारच्या काचा फोडणारा गजाआड; असा गवसला नाशिक पोलिसांना

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group