नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सप्तशृंगी देवी मंदिराच्या पाठीमागील मोकळया मैदानावर दोन जणांनी एका तरूणावर धारदार वस्तूने वार केल्याने तरूण जखमी झाला आहे. अक्षय व दादू (रा.शिवाजीवाडी भारतनगर) असे तरूणास जखमी करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी रिजवान हनिफ शेख (२४ रा.अंजूमन मदरसा जवळ,भारतनगर) या तरूणाने तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख याचा मित्र हुफेज सलिम खान याच्याशी दोघा संशयितांचा रविवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास भारत नगर येथील सप्तशृंगी देवी मंदिराच्या पाठीमागील मोकळया मैदानावर वाद सुरू होता. दोघे मिळून हुफेज खान यास लाथाबुक्यांनी मारहाण करीत असल्याने शेख त्याच्या मदतीला धावून गेला असता ही घटना घडली. यावादावर पडदा पाडण्यासाठी शेख याने धाव घेतली असता संतप्त संशयितांपैकी एकाने शेख यास दगड मारून फेकला तर दुस-याने धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत शेख याच्या डोक्यावर व चेह-यावर वार करण्यात आल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत.