नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नॉयलॉन मांजा विक्री करणा-याला अटक करुन त्यांच्याकडून ३६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सागर छबू निकम (३५ रा.सहवासनगर,कालिकामंदिरामागे) असे अटक केलेल्या विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकम हा प्रणव पंतग शॉप या दुकानात रविवारी (दि.१५) नॉयलॉन मांजा विक्री करतांना मिळून आला. पशू पक्षांसह मानवास धोकेदायक ठरणा-या नॉयलॉन मांजा विक्रीस शहरात बंदी घालण्यात आली आहे. यापार्श्वभूमिवर सर्वत्र छापासत्र सुरू आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या दुकानात राजरोसपणे नॉयलॉन मांजाची विक्री सुरू असल्याची माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला असता संशयित नॉयलॉन मांजा चढ्या दराने विक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या दुकानातून ३५ हजार ९०० रूपये किमतीचा मांजा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस नाईक महेश सांळूके यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार सोनार करीत आहेत.