नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बेकायदा मद्यविक्री रोखण्यासाठी पोलिसांनी रविवारी चार अड्यावर छापे टाकत सुमारे दहा हजाराचा मद्यसाठा हस्तगत केला. त्यात देशी विदेशीसह देशी दारूचा समावेश आहे. इंदिरानगर,देवळाली कॅम्प आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या छाप्यात बाळू तुळशिराम कडलग (रा.क्रांती चौक,पळसे ता.जि.नाशिक) हा युवक पळसे शिवारातील गांधी पेट्रोल पंपाशेजारील पत्र्याच्या शेडच्या बाजूला मद्यविक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून सुमारे ९४० रूपये किमतीचा देशी विदेशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आली. याबाबत पोलिस शिपाई दत्तात्रेय वाजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक पाटील करीत आहेत.
दुस-या छाप्यात रविंद्र तुकाराम गोतरणे (३० रा.मनपा शाळेमागे वडाळागाव) हा युवक रविवारी सकाळच्या सुमारास कोळीवाड्यात बेकायदा मद्यविक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यातून प्रिन्स संत्रा,ट्रंगो पंच नावाची देशी दारूचा सुमारे ७ हजार ३८५ रूपयांचा साठा हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी शिपाई योगेश जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.
तिसरी कारवाई भगूर येथील लहवित रोडवर करण्यात आली. जनार्दन प्रभाकर सांगळे (५८ रा.शिंगवे बहुला ता.जि.नाशिक) हा रविवारी सायंकाळच्या सुमारास भगूर रेल्वे फाटक बागात बिअरच्या बाटल्या विक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यातून एक हजार ११० रूपये किमतीचा बिअरचा साठा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस शिपाई श्याम पाटील यांनी तक्रार दिली आहे.
तर शुभम सुकदेव तनपूरे (२३ रा.वडगाव पिंगळा ता.सिन्नर) हा युवकही रविवारी याच भागातील बलकवडे राईस मिल येथील हॉटेल रायबाच्या भिंतीलगत दारू विक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यातून सुमारे ७४० रूपये किमतीच्या किंगफिशर बिअरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिस नाईक नितीन करवंदे यांनी तक्रार दिली आहे. दोन्ही गुह्यांप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास जमादार पाचोरे आणि हवालदार बागुल करीत आहेत.