India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भारतात जूननंतर मंदी येणार का? केंद्रीय मंत्री नारायण राणे स्पष्टच म्हणाले…

India Darpan by India Darpan
January 16, 2023
in मुख्य बातमी
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर्थिक मंदीचं नाव निघाल्यावर अंगावर काटा यावा, अशी स्थिती आहे. कारण कोरोनाने जगाचे जे हाल केले ते यापूर्वी महायुद्धांमध्ये देखील झाले नव्हते. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आणखी एकदा मंदी येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसे झाले तर बेरोजगारीचं मोठं संकट भारतावर ओढवलं जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

पुणे येथे जी-२० परिषदेच्या उद्घाटनाला नारायण राणे उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. राणे म्हणाले, ‘जूननंतर भारतात मंदी येण्याची शक्यता आहे. पण केंद्र सरकार मंदीच्या परिणामांशी लढण्याकरिता सज्ज आहे. भारतावर या मंदीचा परिणाम होणार नाही.’ मुख्य म्हणजे अलीकडेच आयटी क्षेत्रातील अल्पकालीन मंदीमुळे अमेरिकेसह अनेक देशांमध्ये नोकऱ्यांवर परिणाम झाले. अमेझॉनसह अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरी पाठवलं. अश्यात राणे यांनी बेरोजगारीबद्दल मोठं विधान केलं आहे. उद्योग वाढवले तर रोजगार वाढतील, रोजगार वाढला तर जीडीपी वाढेल. आपल्याला भारतात नफा कमावून देणाऱ्या तंत्रज्ञानाची गरज आहे, असं राणे म्हणाले. तरीही भारताची मंदीला सामोरे जाण्याची पूर्ण तयारी आहे. भारतात मंदी आलीच तर जूननंतर येईल, असेही ते म्हणाले.

म्हणून उद्योग बाहेर जात नाहीत
महाराष्ट्रात सरकार बदलल्यामुळे येथील उद्योग गुजरातमध्ये गेले असा आरोप सातत्याने होत आहेत. पण त्यात काहीही तथ्य नसल्याचे राणे म्हणाले. सरकार बदलले म्हणून उद्योग बाहेर जात नाहीत, असं राणे म्हणाले.

महाराष्ट्रात जमीन महाग
ज्या राज्यांमध्ये रास्त दरात जमीन मिळते, कर कमी भरावा लागतो त्या राज्यांमध्ये उद्योगांची गुंतवणुक जास्त होते. महाराष्ट्रात जमीनी महाग आहेत, पायाभूत सुविधांचे दर जास्त आहेत, त्यामुळे परिणाम होतो. महाराष्ट्र विकसित राज्य असल्यामुळेही परिणाम होतो, असं राणे यांनी स्पष्ट केलं.
ते कमळ भाजपचे नाही
जी-२०च्या बोधचिन्हातील कमळ भाजपचे असल्याचा आरोप विरोधकांकडून होतो. पण ते चिन्ह भाजपचे किंवा भारताचे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी-२० चे अध्यक्ष आहेत, असे राणे यांनी सांगितले.

India Will Face Recession Minister Narayan Rane Says
G20 Summit Pune


Previous Post

MPSCच्या घोळामुळे लाखो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला! उच्च शैक्षणिक अर्हता असतांनाही अर्ज करता येईना

Next Post

बेकायदा मद्यविक्री करणाऱ्या ४ अड्ड्यांवर छापा; एवढा साठा हस्तगत

Next Post

बेकायदा मद्यविक्री करणाऱ्या ४ अड्ड्यांवर छापा; एवढा साठा हस्तगत

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group