नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – व्दारका सर्कल भागात भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार डॉक्टर महिला जखमी झाली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात कारचालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर विश्वनाथ काळे (रा.कोटमगाव ता.निफाड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित कारचालकाचे नाव आहे. याप्रकरणी डॉ.मुनिरा हैसियत चौधरी (रा.सावता माळी गार्डन जवळ,काठेगल्ली) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. डॉ.चौधरी या शनिवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास व्दारका सर्कल कडून सारडा सर्कलच्या दिशेने आपल्या अॅक्टीव्हावर ( एमएच १५ सीझेड ३३९५) प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. कोंडाजी चिवडा या दुकानासमोर व्दारका हॉटेल कडून भरधाव आलेल्या स्विफ्ट कारने (एमएच ०५ बीडी ११०१) दुचाकीस धडक दिली. या अपघातात डॉ. चौधरी यांना दुखापत झाली असून,त्यांच्या अॅक्टीव्हाचेही मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.