नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळय़ा ठिकाणी पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेल्या. याप्रकरणी मंबईनाका आणि गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिली घटना गंगापूररोड भागात घडली. लक्ष्मण काळू जाधव (रा.तळेगाव काचोरली ता.त्र्यंबकेश्वर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जाधव गेल्या २९ ऑक्टोबर रोजी गंगापूररोड भागात गेले होते. श्री गुरूजी हॉस्पिटल समोरील चिकन दुकानाजवळ पार्क केलेली त्यांची ड्रीम युगा एमएच १५ जीसी ५७७३ मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. अधिक तपास पोलिस नाईक झिरवाळ करीत आहेत. दुसरी घटना वडाळा रोडवर घडली. येथील फहीम सलीम खान (रा.रूबीना अपा. सह्याद्री हॉस्पिटल शेजारी) यांची शाईन मोटारसायकल एमएच १५ ईजे ७८६८ शनिवारी (दि.१२) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक बिरारी करीत आहेत.