नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीत बदनामी करण्याची धमकी देत शेजा-याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. सत्यजित चंद्रवंशी (रा.संजीवनगर,अंबड सातपूर लिंकरोड) असे संशयिताचे नाव आहे. या घटनेप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. पीडिता व संशयित एकमेकांच्या शेजारी असून, मुलीच्या कुटुंबियांशी त्याचे चांगले संबध असल्याने तो घरकामासाठी नेहमी मुलीस आपल्या घरी बोलवित असे. १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान संशयिताने मुलीस आपल्या घरात बोलावून घेत हे कृत्य केले. आपल्या बेडरूममध्ये घेवून जात त्याने बळजबरीने बलात्कार केला. याबाबत वाच्यता केल्यास तुझी बदनामी करेन अशी धमकी व दमदाटी देत त्याने वारंवार बलात्कार केल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक फडोळ करीत आहेत.