दोन अल्पवयीन मुली बेपत्ता; कुटुंबियांना अपहरणाचा संशय
नाशिक : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. या दोन्ही घटनेत कुटुंबियांनी त्यांना कुणी तरी पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी पंचवटी आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत घडली. अल्पवयीन मुलगी शुक्रवार पासून बेपत्ता आहेत. ती अद्याप घरी न परतल्याने कुटुंबियांनी तिच्या अपहरणाचा संशय वर्तविण्यात आल्याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.दुसरी घटना पंचवटी परिसरात झाली. येथे राहणारी मुलगी शनिवार पासून बेपत्ता आहे. ती घरात कुणासही काही एक न सांगता निघून गेली असून तिला कोणी तरी पळवू नेल्याचा अंदाज कुटुंबियांनी वर्तविला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.
घरात गळफास लावून घेत आत्महत्या
नाशिक : ३५ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना ओमकारनगर भागात घडली. चंद्रकांत निवृत्ती थोरात (रा.शिवधारा अपा.ओमकारनगर) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. थोरात यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थोरात यांनी रविवारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शालक अजय निकम यांनी दिलेल्या खबरीवरून म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.