नाशिक : मालेगाव स्टॅण्ड ते बिटको हायस्कूल दरम्यान रिक्षाप्रवासात भामट्या सहप्रवासी महिलेचे मंगळसूत्र लंपास केले. या चोरीची प्रयोजना गोविंदराव पाटील (रा.अष्टविनायक नगर,म.बाद रोड) यांनी तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील या गेल्या सोमवारी (दि.८) शालिमार भागात आल्या होत्या. मालेगाव स्टॅण्ड ते बिटको हायस्कूल दरम्यान त्यांनी अॅटोरिक्षाने प्रवास केला. रिक्षात पाटील बसण्यापूर्वीच दोन महिला होत्या. प्रवासात सहप्रवासी असलेल्या महिलांपैकी कुणी तरी त्यांच्या पर्स मध्ये ठेवलेली सुमारे ४० हजार रूपये किमतीची सोन्याचीपोत हातोहात लांबविली. ही घटना रिक्षातून उतरल्यानंतर निदर्शनास आली. अधिक तपास पोलिस नाईक थेटे करीत आहेत.