नाशिक : गंजमाळ भागात घरात कुटुंबिय झोपलेले असतांना चोरट्यांनी धाडसी चोरी करीत सोन्याचे मंगळसुत्र आणि मोबाईल लंपास केले. या चोरी प्रकरणी जीजा संजय जगधणे (रा.मनपा शाळेसमोर,पंचशिलनगर) यांनी तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगधणे कुटुंबिय गुरूवारी रात्री आपल्या घरात झोपलेले असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कुटुंबिय झोपी गेल्याची संधी साधत मध्यरात्री कश्याने तरी दरवाजाची आतील कडी उघडून ही चोरी केली. घरात शिरलेल्या भामट्यांनी अथरूंणाजवळ काढून ठेवलेली सोन्याची पोत व दोन मोबाईल असा सुमारे ३७ हजाराचा ऐवज चोरून नेला. दुस-या दिवशी सकाळी कुटुंबिय उठल्यानंतर ही घटना उघडकीस आली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अहिरे करीत आहेत.