नाशिक : ४८ वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना श्रमिकनगर भागात घडली. विष्णू नामदेव नवले (रा.आयटीआय कॉलनी,श्रमिकनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नवले यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नवले यांनी अज्ञात कारणातून मंगळवारी (दि.९) सकाळपूर्वी आपल्या राहत्या घरातील रूममध्ये पत्र्याच्या अॅगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. कुटुंबिय सकाळी उठवण्यासाठी गेले असता ही घटना निदर्शनास आली. मुलगा सचिन नवले यांनी दिलेल्या खबरीवरून सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.