नाशिक : नाारायणबापू नगर भागात भरधाव दुचाकी घसरल्याने ६२ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मोहनलाल घनशाम केशवाणी (रा.गोसावी मळा,ना.रोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केशवाणी हे रविवारी रात्री नारायणबापू नगर येथून दुचाकीने आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात झाला. नारायण बापू नगर येथून ते दुचाकीवर प्रवास करीत असतांना इंदिरागांधी पुतळा भागात भरधाव दुचाकी घसरली. या अपघातात केशवाणी हे वृध्द गंभीर जखमी झाले होते. कुटूंबियांनी त्यांना जयराम हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ सोपान हॉस्पिटल येथे दाखल केले असता मंगळवारी सकाळच्या सुमारास उपचार सुरू असतांना डॉ.चेतन पाटील यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.