इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी ते जिममध्ये वर्कआऊट करत असताना ट्रेड मिलवर ते अचानक कोसळले. पडल्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यानंतर त्यांना तातडीने एम्समध्ये दाखल करण्यात आले. पडल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला असून त्यांना दोनदा सीपीआर देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
राजू श्रीवास्तव हे दिल्लीतील एका हॉटेलमध्ये थांबले होते आणि बुधवारी सकाळी हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. यादरम्यान ते ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना होऊन ते खाली पडले. तेथे उपस्थित लोकांनी त्यांना तातडीने एम्सच्या आपत्कालीन विभागात दाखल केले. येथे तातडीने हृदयरोग विभागाच्या डॉक्टरांनी त्यांना सीपीआर दिला, त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
एम्सच्या कार्डिओलॉजीमध्ये डॉक्टर त्याच्या उपचारात व्यस्त आहेत, तर त्यांचे करोडो चाहते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात व्यस्त आहेत. राजू श्रीवास्तव हे उत्तर प्रदेशातील कानपूरचे रहिवासी आहेत. त्यांच्या खास शैलीमुळे आणि प्रेक्षकांना अगदी सहजतेने हसवितात. त्यामुळेच त्यांचे लाखो चाहते आहेत. टीव्ही शो, स्टेज शो व्यतिरिक्त त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. प्रसिद्ध कॉमेडियन असण्यासोबतच ५८ वर्षीय राजू श्रीवास्तव हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते देखील आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यापूर्वी ते समाजवादी पक्षातही होते.
Comedian Raju Shrivastav Admitted in AIIMS Delhi
Cardiac Arrest Heart Attack Entertainment