नाशिक : कॉलेजरोडवरील एका बिअर बार मध्ये मद्यधुंद अवस्थेत नाचत असतांना धक्का लागल्याच्या कारणातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत तरूणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विराज पाटील (रा.रिलायन्स पेट्रोल पंपामागे,दिंडोरीरोड) व त्याचे तीन मित्र अशी तरूणास मारहाण करणा-या टोळक्याचे नाव आहे. याप्रकरणी रोहित सुधीर चिन्ने (२२ रा. विद्यानगर,म.बादरोड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. चिन्ने शनिवारी (दि.२३) रात्री पार्टी करण्यासाठी आपल्या मित्रांसमवेत डिसूजा कॉलनीतील हॉटेल मॉलीक्यूस क्लब या बिअर बारमध्ये गेला होता. मद्यधुंद अवस्थेत तिघे मित्र नाचत असतांना ही घटना घडली. ग्रुपमध्ये नाचत असतांना संशयित व त्याच्या साथीदारांनी धक्का लागल्याच्या कारणातून वाद घालून आमच्या घोडा आहे आता तुमचा बेत पाहतो असे म्हणत चिन्ने यांच्या मित्रांना शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत संतप्त टोळक्यातील एकाने बिअरची बाटली चिन्ने यांच्या डोक्यात फोडल्याने ते जखमी झाले असून हवालदार मोरे करीत आहेत.