नाशिक : मखमलाबाद रोड भागात घराच्या आवारात पाय घसरून पडल्याने ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नंदा देवकीनंदन निकम (रा.लिलावती हॉस्पिटल जवळ,विद्यानगर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.निकम रविवारी (दि.२४) सकाळच्या सुमारास आपल्या घराच्या आवारातून जात असतांना ही घटना घडली होती. अचानक पाय घसरल्याने त्या पडल्या होत्या. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने व नाका तोंडातून रक्त आल्याने कुटूंबियांनी त्यांना तातडीने दिंडोरीरोडवरील सिनर्जी हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.