अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
देशाच्या १५ व्या राष्ट्रपतीपदी प्रथमच आदिवासी महिलेची निवड झाल्या नंतर आज त्यांचा शपथविधी मोठ्या थाटात संपन्न झाला. त्यांच्या शपथविधी एकीकडे होत असताना मालेगाव शहरात भारतीय जनता पक्षाने जिल्हाध्यक्ष सुरेश नाना निकम, अव्दैय आबा हिरे, सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत आदिवासी पथकाचे नृत्य, डान्स यावेळी सादर करण्यात येऊन जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.