नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुगार खेळणा-या नऊ जणांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे बारा हजाराचा ऐवज हस्तगत केला. जुने नाशिक परिसरातील मौलाबाब जीम परिसरात उघड्यावर हे सर्व जण जुगार खेळत होते.
शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश भास्कर बोरदे (रा.शिवाजीचौक कथडा),सलीम अमीर बेग (रा.खडकाळी),विजय धोंडीराम निकम (रा.अवधुत वाडी,दिंडोरीरोड),सुरेश गंगाराम शेजवळ (रा.भिमरोड.ना.रोड),मोहम्मद युसूफ बागवान (रा.बागवानपुरा),विकी राजू सोनपसारे (रा.शालीमार),दत्तू महादू बेंडकुळे (रा.गंजमाळ झोपडपट्टी),सुरज राजेंद्र बागुल (रा.गौळाणे),गणपत हरिभाऊ सावंत (रा.मिलींदनगर तिडकेकॉलनी) व मैनोद्दीन बाबू कोकणी (रा.फाळकेरोड भद्रकाली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे.
मौसाना बाबा जीम भागात एका भिंतीच्या आडोशाला काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती युनिट १ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.१७) सायंकाळी पोलिसांनी धाव घेत छापा टाकला असता संशयित कल्याण मेनटाईम नावाचा मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले.
संशयितांच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य असा सुमारे १२ हजार ८० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याबाबत युनिटचे हवालदार प्रदिप म्हसदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक ठेपणे करीत आहेत.