India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सुक्या खजुराच्या नावाखाली आयात केली ३३ टन सुपारी; तस्करी प्रकरणी नाशिकमधून व्यापाऱ्याला अटक

India Darpan by India Darpan
February 20, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक विमानतळाजवळ नागपूरच्या सीमा शुल्क विभागाची कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)
–  दुबईमधून सुक्या खजुराच्या नावाखाली आयात केलेल्या ३३ टन सुपारीची तस्करी करणा-या व्यापा-याला अटक करण्यात आली आहे. या व्यापा-यास न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला दोन दिवसाची पोलिस न्यायालयीने कोठडी सुनावण्यात आली आहे. नागपूर सीमा शुल्क विभागाने ही तस्करी उघडकीस आणली आहे. अडीच कोटी रुपयांची सुपारी असून बाजारात हिची किंमत अधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नाशिक विमानतळाजवळील जानोरी कार्गो हब असून येथे ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी पीके इंटरप्राईजेसचे संचालक प्रथमेश विजय काटकर या व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. नागपूर सीमा शुल्क विभागाने कार्गो हबवर सहा कंटेनरची तपासणी केल्यानंतर हे तस्करी प्रकरण समोर आले आहे. या तपासणीत ३३ टन सुपारी आढळली. या सुपारीचे बाजारमूल्य तब्बल २ कोटी ४८ लाख रुपये असून दंड आकारणीसह त्याची एकूण किंमत ६ कोटी ४१ लाख रुपये असल्याचे पथकाने सांगितले. दुबई येथील जुबेर अली यांच्या नावाने हे कंटेनर बुक करण्यात येत होते. या या तस्करी प्रकरणी सीमा शुल्क कायदा १९६२ च्या तरतुदीनुसार दंड आकारणी करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुंबई व नाशिक येथील गोदाम व कार्यालयांवर छापे टाकून आक्षेपार्ह कागदपत्रेही जप्त केली आहे.


Previous Post

नाशिक शहरात अपघाताचे सत्र सुरुच; वेगवेगळ्या अपघातांमध्ये कारचालकासह दुचाकीस्वार ठार

Next Post

परीक्षांच्या तोंडावर शिक्षकेतर कर्मचारी संपावर; राज्यभरातील महाविद्यालयांवर परिणाम

Next Post

परीक्षांच्या तोंडावर शिक्षकेतर कर्मचारी संपावर; राज्यभरातील महाविद्यालयांवर परिणाम

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group