नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात आणि त्यानंतर बसला लागलेल्या भीषण आगीमध्ये तब्बल ११ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना २ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार असल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. तसेच, जखमींना ५० हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांना त्यांनी श्रद्धांजली व्क्त केली आहे. स्थानिक प्रशासनाकडून सर्वतोपरी मदतकार्य सुरू आहे आणि यापुढेही केले जाईल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे.
https://twitter.com/PMOIndia/status/1578591829641289728?s=20&t=aLgOLf1mKRCUEZF5_lVvWw
मुख्यमंत्र्यांकडूनही मदत जाहीर
नांदूरनाका येथे झालेल्या खासगी बसच्या भीषण दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करून या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अपघाताच्या कारणांचा सर्वंकष चौकशीतून शोध घेतला जाईल. त्याबाबत सर्व यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. घटनास्थळावरील मदतीसाठी तसेच रूग्णालयातील उपचारासाठी सर्व यंत्रणा तातडीने कार्यान्वित व्हाव्यात यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1578585997779955712?s=20&t=aLgOLf1mKRCUEZF5_lVvWw
Nashik Bus Fire Accident PM Modi Announcement