बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक बस आग दुर्घटना – मृतांची ओळख पटविण्यासाठी करणार डीएनए टेस्ट; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

by India Darpan
ऑक्टोबर 8, 2022 | 11:59 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20221008 WA0027 e1665207771559

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक- नांदूरनाका येथे खासगी बसच्या भीषण अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू तर ३४ प्रवाशी जखमी झाले आहे. या अपघातात मृत झालेल्या प्रवाशांची ओळख पटत नसल्याने संबंधित मृतांच्या ओळखीसाठी डीएनए टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी दिली. या अपघातानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मदत कक्ष तयार करण्यात आले असून दोन टोल फ्री नंबरही देण्यात आले आहेत.

पहाटे झालेल्या या अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू तर ३४ प्रवाशी जखमी झाले आहे. मिरची हॅाटेलजवळ येथील चौफुलीवर पहाटे ५ वाजता ही घटना घडली आहे. ट्रेलर व बसमध्ये हा अपघात झाला. ही बस यवतमाळहून मुंबईकडे जात असतांना ही दुर्दैवी घटना घडली. ही घटना झाल्यानंतर अनेक प्रवाशी झोपेत होते. स्लिपर कोच असल्यामुळे अनेक प्रवाशांना उठण्यास वेळ लागला. काही प्रवाशी उतरले. यातील जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या गाडीत ४८ प्रवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. ही गाडी चिंतामणी ट्रव्हल्सची असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या आगीत बस जळून खाक झाली आहे.

या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी अपघातस्थळी भेट देणार आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक येथील अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पहाटे नाशिक शहरामध्ये ट्रेलर व ट्रॅव्हल बस यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातामुळे जखमी व मयत व्यक्ती विषयी अधिक माहिती संबंधितांना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन शाखा आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिक येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला असून सदर नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी क्रमांक खालील प्रमाणे आहेत .
+912532572038
+912532576106
जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक

Nashik Bus Fire Accident Collector DNA Test

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकच्या बस आग दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घेतली दखल; केली ही घोषणा

Next Post

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष सागरानंद सरस्वती यांचे निधन

India Darpan

Next Post
IMG 20221008 WA0015

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष सागरानंद सरस्वती यांचे निधन

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011