India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिकच्या बस आग दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घेतली दखल; केली ही घोषणा

India Darpan by India Darpan
October 8, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात आणि त्यानंतर बसला लागलेल्या भीषण आगीमध्ये तब्बल ११ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना २ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार असल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. तसेच, जखमींना ५० हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांना त्यांनी श्रद्धांजली व्क्त केली आहे. स्थानिक प्रशासनाकडून सर्वतोपरी मदतकार्य सुरू आहे आणि यापुढेही केले जाईल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे.

An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each of the deceased due to the bus fire in Nashik. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi

— PMO India (@PMOIndia) October 8, 2022

मुख्यमंत्र्यांकडूनही मदत जाहीर
नांदूरनाका येथे झालेल्या खासगी बसच्या भीषण दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करून या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अपघाताच्या कारणांचा सर्वंकष चौकशीतून शोध घेतला जाईल. त्याबाबत सर्व यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. घटनास्थळावरील मदतीसाठी तसेच रूग्णालयातील उपचारासाठी सर्व यंत्रणा तातडीने कार्यान्वित व्हाव्यात यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.

नाशिक- नांदूरनाका येथे खाजगी बसच्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. #Nashik

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 8, 2022

Nashik Bus Fire Accident PM Modi Announcement


Previous Post

नाशिक बस दुर्घटना – यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड थेट चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात

Next Post

नाशिक बस आग दुर्घटना – मृतांची ओळख पटविण्यासाठी करणार डीएनए टेस्ट; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Next Post

नाशिक बस आग दुर्घटना - मृतांची ओळख पटविण्यासाठी करणार डीएनए टेस्ट; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group