India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

येत्या ९ डिसेंबरपासून अंकुर फिल्म फेस्टिव्हल; हे आहे यंदाचे आकर्षण…

India Darpan by India Darpan
December 5, 2022
in मनोरंजन
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकची ओळख होऊ पाहणाऱ्या ९ व्या अंकुर फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन अभिव्यक्ती मिडीया फॉर डेव्हलपमेंटकडून करण्यात येत आहे. येत्या दिनांक ९ ते ११ डिसेंबर २०२२ या दरम्यान कुसुमाग्रज स्मारक, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड येथे रोज सकाळी १० ते रात्री ६ वाजेपर्यंत फेस्टिव्हल संपन्न होणार आहे. हा फेस्टिवल सर्वासाठी खुला असून यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. फेस्टिव्हलचे औपचारिक उद्घाटन प्रसिद्ध माहितीपट निर्मात्या शबानी हसनवालिया, थर्ड आय, नवी दिल्ली यांच्या रात या माहितीपटाने होणार आहे. तर फेस्टीव्हलचा समारोप ९ डिसेंबरला हंसा थपलियाल माहितीपट निर्मात्या, बेंगळूरू यांच्या द आउटसाइड इन या माहितीपटाच्या सादरीकरणाने होणार आहे. फेस्टिव्हलमध्ये ५० हून अधिक फिल्मस्, माहितीपट, या कलाकृतीचे सादरीकरण होणार असून वेगवेगळ्या विषयावर कार्यशाळा देखील संपन्न होणार आहेत.

या फेस्टिवलमध्ये नवोदित कलाकारांना, वंचित समूहांतील घटकांना आपले जगणे मांडण्यासाठी असलेले व्यासपीठ म्हणजे अंकुर फिल्म फेस्टिव्हल असतो. यामध्ये फक्त फिल्म्सचे सादरीकरणच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांकडून शिकून आपली अभिव्यक्ति आणखी समृद्ध करण्यासाठीची संधी म्हणजे अंकुर फिल्म फेस्टिव्हल असतो. यात कुठलीही स्पर्धा नाही, पारितोषिक नाही, अंतिम कलाकृतीपेक्षा कलाकृतीपर्यंत पोहचण्याच्या प्रयत्नांचे कौतुक करण्याच्या उद्देशाने अंकुर फिल्म फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येते. तरी नाशिककरांनी आवर्जून अंकुर फेस्टीव्हलमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अभिव्यक्तीकडून करण्यात आले आहे.

अशी आहेत अंकुरची आकर्षणे……
उद्घाटन, माहितीपट स्क्रीनिंग आणि चर्चा :
दिनांक ९ डिसेंबर: शबानी हसनवालिया थर्ड आय, नवी दिल्ली.
माहितीपट : रात
वेळ: सायं. ६.३० ते ८:३० वाजता
कार्यशाळा :
दिनांक १० डिसेंबर, देबस्मिता आणि अंशुमन एजेंट्स ऑफ इश्क, मुंबई.
विषय : लिंगभाव, संमती आणि लैंगिकता
वेळ स. १०:०० ते दु. १.०० वाजता

माहितीपट स्क्रीनिंग आणि चर्चा :
दिनांक १० डिसेंबर, बिशाखा दत्ता, पॉईंट ऑफ व्ह्यू, मुंबई,
फिल्म ताजा खबर हॉट ऑफ द प्रेस – डिजिटल स्टोरीज
वेळ सायं ६:३० ते ८.३० वाजता.
कार्यशाळा :
पौर्णिमा आगरकर,INECC पुणे,
विषय : हवामान बदल आणि कृतीशील प्रतिसाद
दिनांक ११ डिसेंबर २०२२
वेळ स. १०:०० ते दु. १.०० वाजता.

समारोप, माहितीपट स्क्रीनिंग आणि चर्चा :
दिनांक ११ डिसेंबर २०२२
हंसा थपलियाल, माहितीपट निर्मात्या, बेंगळूरू.
माहितीपट, द आउटसाइड इन
वेळ: सायं. ६.३० ते ८:३० वाजता


Previous Post

‘सलमान खानने मला सिगारेटचे चटके देऊन मारहाण केली’, माजी गर्लफ्रेंड सोमी अलीचे धक्कादायक आरोप

Next Post

अशक्तपणा… सुजलेला चेहरा… या अभिनेत्रीची झाली अशी अवस्था

Next Post

अशक्तपणा... सुजलेला चेहरा... या अभिनेत्रीची झाली अशी अवस्था

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी राज्यात कुठे किती मतदान? बघा, आकडेवारी

January 30, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

धरणामध्ये आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

January 30, 2023

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

January 30, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज अति घाई करु नाही; जाणून घ्या, मंगळवार, ३१ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 30, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – ३१ जानेवारी २०२३

January 30, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – हस्तरेषा ज्ञान

January 30, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group