नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – “कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय” मविआ आमदारांची जोरदार घोषणाबाजीने विधिमंडळाचा परिसर आज दणाणून गेला. शिंदे – फडणवीस सरकारने आवाज दाबण्यासाठी आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेली कारवाई आणि कर्नाटक सरकारविरोधात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायर्यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कर्नाटक सरकारचा निषेध करतानाच आमदार जयंत पाटील यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून सभागृहात न जाता पायर्यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे आमदार पायर्यांवर आंदोलन करत आहेत.
बेळगाव कारवार आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, सरकार हमको दबाती कर्नाटक को घबराती है, कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध, सीमा प्रश्नी भूमिका घ्या नाहीतर खुर्च्या खाली करा अशा जोरदार घोषणा महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या. pic.twitter.com/b2hUkMYbM8
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) December 23, 2022
Maharashtra Winter Assembly Session Nagpur
Karnataka Border Dispute Slogan MVA MLA Opposition Leaders