India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पॉईँट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या गंभीर प्रश्नांकडे वेधले लक्ष

India Darpan by India Darpan
December 30, 2022
in राज्य
0

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रविरोधी कुरघाड्या करत कर्नाटक सरकारने आता महाराष्ट्राचे पाणी पळविण्याच्या प्रयत्न सुरु केला असून यामुळे राज्याचा पाणीहिस्सा आणि पर्यावरणाला ही धोका निर्माण होणार असल्याची बाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत पॉईँट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून राज्य सरकारच्या लक्षात आणून दिली.

महाजन आयोगानुसार खानापूर तालुक्यातील ३० गावांचा समावेश महाराष्ट्रात करण्याची शिफारस आहे. कळसा भांडुरा प्रकल्पामुळे गोव्याबरोबरच महाराष्ट्रालाही फटका बसणार आहे. महाराष्ट्रातील विर्डी प्रकल्पाला याचा फटका बसणार आहे. याचमुळे महाराष्ट्र सरकारने देखील याविरोधात न्यायालयात धाव घेणे गरजेचे आहे. कर्नाटक सरकार भाषेबाबत गळचेपी करत असतानाच आता महाजन आयोगानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या खानापूरमधील पाणी स्वतःच्या धारवाडमध्ये वळवू पाहत आहे. महाजन आयोगाचा अहवाल हाच अंतिम असल्याचे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे. तसे असल्यास कळसा भांडुरा प्रकल्पाच्या अखत्यारीत खानापूर तालुक्यातील ही गावे येतात. याचबरोबर या प्रकल्पामुळे पाणी आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होणार आहे. महाजन आयोगानुसार खानापूर तालुका हा महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहे. अशा स्थितीत कर्नाटक सरकारने कळसा – भांडुरा प्रकल्प हाती घेणे गैर असल्याचा मुद्दा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या लक्षात आणून दिला.


Previous Post

डॉक्टरच्या घरात चोरी; रोकडसह देवदेवतांच्या मुर्त्या चोरट्यांनी चोरून नेल्या

Next Post

चक्कर येऊन पडल्याने दोघांचा मृत्यू ; शहरातील वेगवेगळ्या भागातील दोन घटना

Next Post
प्रातिनिधीक फोटो

चक्कर येऊन पडल्याने दोघांचा मृत्यू ; शहरातील वेगवेगळ्या भागातील दोन घटना

ताज्या बातम्या

विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; कोकण शिक्षक मतदारसंघात यांचा झाला विजय

February 2, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

२५ वर्षांच्या प्रेमाचा अंत! लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने अॅसिड टाकून प्रेयसीचा घेतला जीव

February 2, 2023

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023

अदानी समुहाच्या वादात आता RBIची एण्ट्री; बँकांकडून मागविली ही माहिती

February 2, 2023

‘उपराष्ट्रपती धनखड आणि कायदामंत्री रिजिजूंंना अपात्र ठरवा’, वकीलांच्या संघटनेची हायकोर्टात धाव

February 2, 2023

अर्थसंकल्प नेमका कसा आहे? मंत्री रामदास आठवलेंचा व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्हीही बघा…

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group