नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मखमलाबादरोडवरील स्वामी जनार्दननगर भागात बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी डॉक्टरच्या घरातील रोकडसह देवदेवतांच्या मुर्त्या चोरून नेल्या. चोरट्यांनी सुमारे ३७ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. या चोरी प्रकरणी डॉ.नितीन दत्तात्रेय रौंदळ (रा.ओम साई. स्वामी जनार्दननगर ) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रौंदळ कुटुंबिय १८ ते २८ डिसेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील २५ हजाराची रोकड, चांदीच्या देवदेवतांच्या मुर्त्या आणि महत्वाचे कागदपत्र असा सुमारे ३७ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. अधिक तपास हवालदार कुलकर्णी करीत आहेत.