नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – “कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय” मविआ आमदारांची जोरदार घोषणाबाजीने विधिमंडळाचा परिसर आज दणाणून गेला. शिंदे – फडणवीस सरकारने आवाज दाबण्यासाठी आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेली कारवाई आणि कर्नाटक सरकारविरोधात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायर्यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कर्नाटक सरकारचा निषेध करतानाच आमदार जयंत पाटील यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून सभागृहात न जाता पायर्यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे आमदार पायर्यांवर आंदोलन करत आहेत.
https://twitter.com/NCPspeaks/status/1606176473060200449?s=20&t=pxICnOIaZWwPYurUYiWIbA
Maharashtra Winter Assembly Session Nagpur
Karnataka Border Dispute Slogan MVA MLA Opposition Leaders