कल्याण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – असे म्हणतात की, भांड्याला भांडे लागतेच आणि त्याच आवाज होतोच. म्हणजेच कोणत्याही घरात काही ना काही तरी कारणावरून वाद किंवा भांडण होतच असतात. अर्थात ही भांडणे कुटुंबिक स्वरूपाची असल्याने ती मिटतातही. त्यात विशेषतः पती-पत्नीचे किंवा सासू-सुनेचे भांडण हे तर होतच असते. परंतु काही वेळा किरकोळ भांडणातून अथवा वादातून एखाद्या गैरप्रकारे घडतो. असाच एक प्रकार अंबरनाथ शहरात घडला आहे.
वडवली सेक्शन परिसरातील एका घरात सासूबाई स्तोत्र पठण करीत होत्या. त्याचवेळी सून टीव्ही पाहत होती. टीव्हीचा आवाज मोठा असल्याने सासूबाईंना त्रास होत होता. त्यामुळे सासूबाईंनी संतापात टीव्ही बंद केला. त्यावरून सासू सुनांमध्ये वाद सुरू झाला. वादात हातवारे करत बोलणाऱ्या सासुच्या हाताच्या तीन बोटांचा सुनेने थेट चावाच घेतला. हे प्रकरण आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले असून सासूला चावा घेणाऱ्या सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६० वर्षीय सासू ही घरात स्तोत्र पठण करत होती. त्याचवेळी ३२ वर्षीय सुनेने टीव्हीचा आवाज वाढवला. स्तोत्र पठण करण्यात अडथळा आल्याने सासू बाईंनी थेट टिव्ही बंद करून टाकला. त्याचा सूनेला राग आला. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाला. हे माझे घर आहे, या घरात मी काहीही करेन, अशा अर्वाच्च भाषेत सूनेने सासूला खडसावण्यास सुरूवात केली. सासू सुद्धा संतापली. हे माझ्या नवऱ्याचे घर आहे, असे सासू ठणकावून सांगू लागल्या. त्याचवेळी सासूने हातवारे केल्याने सून संतापली. सासुबाईंना थेट शिवीगाळ करत सासूच्या उजव्या हाताच्या तीन बोटांना तिना चावा घेतला. यात सासूला दुखापत झाली. इतक्यात तेथे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या आपल्या पतीलाही या सुनबाईने शिवीगाळ करत ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुम्हाला बघुन घेईल अशी धमकीही दिली. या प्रकारानंतर सासूबाईंनी थेट अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठले. याप्रकरणी सासूने दिलेल्या तक्रारीवरुन सूनेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mother In Law and Daughter in Law Dispute Police FIR
Ambarnath Crime