India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘उर्फी जावेद हाजीर हो!’ मुंबई पोलिसांसमोर चौकशीला उपस्थित राहणार

India Darpan by India Darpan
January 14, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या नवीन ड्रेसमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर फोटोग्राफर्सना पोज देते, ज्यासाठी तिला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलला सामोरे जावे लागते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेदला आज, शनिवारी मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याची माहिती समोर येत आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे. एजन्सीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया प्रभावशाली उर्फी जावेदला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या तक्रारीच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी आज म्हणजेच शनिवारी चौकशीसाठी बोलावले आहे.
मॉडेल उर्फी जावेद ही सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवत असल्याचा आरोप भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला. याप्रकरणी तिने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच, मुंबई पोलिसांकडे अभिनेत्रीवर कठोर कारवाईची मागणी केली होती.

उर्फी जावेद हिने महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची शुक्रवारी भेट घेतली. तिथे तिनी रुपाली चाकणकर यांच्याशी या विषयावर चर्चा केली. महिला आयोगाच्या अध्यक्षांना भेटण्यासाठी गेलेल्या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री तिच्या वेगळ्या लूकमध्ये दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. उर्फीच्या वकिलानेही भाजप नेत्याविरोधात तक्रार दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. उर्फीचे नाव वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. सार्वजनिक ठिकाणी अश्‍लीलता दाखवल्याचा आरोप करत यापूर्वीही मॉडेलविरोधात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या.

Model Urfi Javed Mumbai Police Enquiry Today


Previous Post

येवल्यात पतंगोत्सवाला सुरुवात; नायलॉन मांजामुळे एक जण जखमी

Next Post

धक्कादायक! जोशीमठमध्ये रेपवेच्या प्लॅटफॉर्मलाही तडे; अखेर घेतला हा निर्णय

Next Post

धक्कादायक! जोशीमठमध्ये रेपवेच्या प्लॅटफॉर्मलाही तडे; अखेर घेतला हा निर्णय

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group