India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

धक्कादायक! जोशीमठमध्ये रेपवेच्या प्लॅटफॉर्मलाही तडे; अखेर घेतला हा निर्णय

India Darpan by India Darpan
January 14, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भूस्खलनामुळे आशिया खंडातील सर्वात मोठ्या जोशीमठ-औली रोपवेच्या प्लॅटफॉर्मला तडे गेले आहेत. धोका लक्षात घेता रोपवेचे काम थांबवण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री रोपवेवर दरड कोसळली आहे. प्रशासनाने असुरक्षित घोषित केलेल्या परिसरात रोपवेचा एक टॉवर आहे, त्यामुळे रोपवेबाबतची भीतीही वाढली आहे.

जोशीमठमध्ये दरड कोसळल्याने जोशीमठ-औली रोपवेलाही फटका बसला आहे. यापूर्वी ज्या ठिकाणी प्रशासनाने चार वॉर्ड असुरक्षित घोषित केले होते, त्याच ठिकाणी मनोहरबाग वॉर्डही असून येथे रोपवेचा एक नंबर टॉवर बसवण्यात आला आहे. रोपवेचे व्यवस्थापक दिनेश भट्ट यांनी सांगितले की, रोपवेच्या टॉवरवर दररोज नियमितपणे लक्ष ठेवले जात आहे.

या रोपवेचे जोशीमठ ते औली हे अंतर सुमारे चार किमी आहे. त्यात 10 टॉवर आहेत. रोपवेने जोशीमठहून औलीला जाण्यासाठी १५ मिनीटे लागतात. औलीला जाण्यासाठी रोपवे ही पर्यटकांची पहिली पसंती आहे. जोशीमठ दुर्घटनेतून धडा घेत राज्य मंत्रिमंडळाने सर्व डोंगरी शहरांचे वहन क्षमता सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत क्षेत्रात सर्वेक्षण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. लोकसंख्या आणि अव्यवस्थित बांधकाम क्रियाकलापांमुळे डोंगरी शहरांवर त्यांच्या वहन क्षमतेपेक्षा जास्त दबाव वाढत आहे. जोशीमठ दरड कोसळण्यामागील एक कारण म्हणजे शहरातील भार वहन क्षमतेपेक्षा जास्त बांधकाम हे देखील आहे.

Uttarakhand Joshimath Auli Ropeway Cracks Landslide


Previous Post

‘उर्फी जावेद हाजीर हो!’ मुंबई पोलिसांसमोर चौकशीला उपस्थित राहणार

Next Post

सोसायटीच्या लिफ्टमध्ये महिलेसमोर अश्लील चाळे, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Next Post

सोसायटीच्या लिफ्टमध्ये महिलेसमोर अश्लील चाळे, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक फोटो

धक्कादायक! सर्वसामान्यांनो, इकडे लक्ष द्या, कर्ज घेताच तब्बल ७ लाख कंपन्यांनी गुंडाळला गाशा

February 1, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

February 1, 2023

खळबळजक! शेतकरी महिलेच्या शरीराचे तुकडे करुन खून; मालेगाव तालुका हादरला

January 31, 2023
प्रातिनिधीक फोटो

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता भरावे लागणार एवढे परीक्षा शुल्क; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

January 31, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगर उत्पादक महेंद्र छोरिया यांना पुरस्कार

January 31, 2023

महाराष्ट्र भूषण पुरस्कारार्थींना मिळणार आता एवढे लाख रुपये; राज्य सरकारची घोषणा

January 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group