इन्फिनिक्सने पुरस्कार विजेता ‘नोट १० प्रो’ आणि ‘प्रीमियम नोट १०’ लॉन्च केला

मुंबई – मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवलेल्या हॉट १० सीरीजनंतर इन्फिनिक्स या ट्रान्सशन ग्रुपमधील प्रीमियम स्मार्टफोन ब्रँडने आता त्यांची जागतिक पातळीवरील लोकप्रिय नोट १० सीरीज भारतात आणली आहे. इन्फिनिक्सच्या नोट सीरीजमधील नवे उत्पादन नोट १० प्रोने मोहक स्वरुपासाठी प्रतिष्ठीत आयएफ डिझाइन अवॉर्ड २०२१ जिंकला आहे. प्रीमियम आणि पॉवरफुल गेमिंग फोनमध्ये स्थान मिळवलेला हा सर्वात नवा नोट १० प्रो फ्लिपकार्टवर ८+२५६ व्हेरिएंटमध्ये प्री ऑर्डरवर १६,९९९ रुपयांत उपलब्ध आहे. तर नोट १० हा १०,९९९ रुपयांत ४+६४ व्हेरिएंटमध्ये आणि ११,९९९ रुपयांत ६+१२८ व्हेरिएंटमध्ये घेता येईल.
आयएफ डिझाइन अवॉर्ड २०२१ मिळालेल्या नोट १० प्रो मध्ये, दोन्ही डिव्हाइसला ६.९५” एफएचडी+ सुपर फ्लुएड डिस्प्ले आणि १८०एचझेड टच सँपलिंग रेट, अप्रतिम व्हिडिओ पाहण्याच्या अनुभवाकरिता डीटीएस सिनेमॅटिक ड्युएल स्पीकर्ससह. नोट १० प्रोचा रिफ्रेश रेट ९०एचझेड आहे. अँड्रॉइड ११ एक्सओएस ७.६ वर ऑपरेटिंग असलेल्या नोट १० प्रोमध्ये अल्ट्रा-पॉवरफुल हेलिओ जी९५ प्रोसेसरचे समर्थन असून नोट १० ला हेलिओ जी८५ प्रोसेसरचे समर्थन आहे. यात अप्रतिम गेमिंग अनुभवासाठी गेम बुस्टिंग डार-लिंक टेक्नोलॉजी आहे.
नोट १० प्रो हा ८जीबी रॅम/ २५६ जीबी इंटरनल स्टोरेज आणि यूएफएस २.२ स्टोरेज टेक्नोलॉजी असलेला या श्रेणीतील पहिलाच स्मार्ट फोन आहे. तर नोट १० मध्ये ४जीबी रॅम/६४ जीबी आणि ६ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोरेज पर्याय आहेत. ५००० एमएएच बॅटरीचे बॅक अप, जवळपास ४९ दिवसांचा स्टँडबाय वेळ असलेल्या नोट १० प्रोमध्ये ३३व्हॉट्सची सेफ फास्ट चार्ज टेक्नोलॉजी असून नोट १० च्या बॅटरीला १८ व्हॉट्सच्या सेफ फास्ट चार्जिंगचे पाठबळ आहे. दोन्ही टीयूव्ही रीनलँडद्वारा प्रमाणित आहेत.
नोट १० प्रो मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप असून त्यात एफ/१.७९ लार्ज अपार्चरसर ६४ एमपी रिअर कॅमेरा आहे. नोट १० मध्ये ४८ एमपी एआय ट्रिपल रिअर कॅमेरा असून त्यात एफ/१.७९ लार्ज अपार्चरची सुविधा आहे. या दोन्ही डिव्हाइसमध्ये १६ एमपी एआय सेल्फी कॅमेरा, एफ/२.० अपार्चरसह देण्यात आला आहे.