नाशिक – मोबाइल हिसकावून पळून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले

मोबाइल हिसकावून पळून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले
नाशिक – युवकास धक्का मारुन त्याच्याकडील मोबाइल हिसकावून पळून जाणाऱ्या दोघा संशयितांना सरकारवाडा पोलिसांनी पकडले आहे. गौरव सागर बागुल (२७) व करण प्रकाश शर्मा (२७, दोघे रा. होलाराम काॅलनी) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. रोहित गोविंद काटकर (२४, रा. पाथर्डी फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्र्यंबकरोडवरील शासकीय दुध डेअरीजवळून मंगळवारी (दि.८) सकाळी साडेआठच्या सुमारास ते जात होते. त्यावेळी दोघा संशयितांनी रोहित यांना धक्का मारुन पाडले. तसेच मोबाइल हिसकावून एमएच १५ एफयु ४७६५ क्रमांकाच्या रिक्षातून पसार झाले. पोलिसांनी तपास करुन दोघा संशयितांना पकडले. त्यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

…..

गळफास घेत आत्महत्या
नाशिक – वेगवेगळ्या घटनांमध्ये एक तरुणी व ४३ वर्षीय पुरुषाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आडगाव शिवारातील शरयू पार्क परिसरात राहणाऱ्या अक्षदा साहेबराव बोरसे (२१) यांनी बुधवारी (दि.९) राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत चुंचाळे शिवारातील केवल पार्क रोड परिसरात राहणाऱ्या रणबहादूर मोतीबहादूर बस्नेत (४३) यांनी देखील बुधवारी दुपारी गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.