India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पदवीधर आणि शिक्षक संघासाठी जोरदार रस्सीखेच

India Darpan by India Darpan
December 29, 2022
in राष्ट्रीय
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघ आणि तीन शिक्षक मतदारसंघ अशा एकूण पाच मतदार संघांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. नाशिक व अमरावती विभाग पदवीधर तसेच कोकण, औरंगाबाद आणि नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी ही निवडणूक ३० जानेवारी २०२३ राेजी होणार आहे. आजपासून या निवडणुकीची आचारसंहिता संबंधित पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात लागू करण्यात आली आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
गुरुवार दि. ५ जानेवारी २०२३ रोजी या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. गुरुवार दि. १२ जानेवारी २०२३ ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. शुक्रवार दि. १३ जानेवारी २०२३ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल, सोमवार दि. १६ जानेवारी २०२३ ही नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख असेल. सोमवार दि. ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून गुरुवार दि. २ फेब्रुवारी २०२३ रोजी मतमोजणी होईल.

सर्वश्री डॉ. सुधीर तांबे (नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ), डॉ. रणजित पाटील (अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ), श्री.विक्रम काळे (औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ), श्री.नागोराव गाणार (नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ), श्री. बाळाराम पाटील (कोकण विभाग शिक्षक मतदार संघ) हे विधानपरिषद सदस्य ७ फेब्रुवारी २०२३ रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या या पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

MLC 5 Seat Election Declared Graduate and Teachers Constituency


Previous Post

उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकरांमध्ये मोठी शाब्दिक चकमक; बघा, नागपुरात नेमकं काय घडलं?

Next Post

हे पहा, ४५ रुपयांचे ज्यूस थेट १५० रुपयाला… अशी होतेय सर्रास फसवणूक…. तातडीने येथे करा तक्रार

Next Post

हे पहा, ४५ रुपयांचे ज्यूस थेट १५० रुपयाला... अशी होतेय सर्रास फसवणूक.... तातडीने येथे करा तक्रार

ताज्या बातम्या

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने सुरू केली व्हॉटस्अ‍ॅप बँकिंग सेवा; असा होणार ग्राहकांना फायदा

April 2, 2023
प्रातिनिधिक फोटो

४५ वर्षाची मामी आणि २४ वर्षाचा भाचा.. दोघांचे प्रेमसंबंध… त्यानंतर असं घडलं की पोलिसही झाले अवाक…

April 2, 2023

हाय रे देवा… कांद्याला मिळाला २५ पैसे प्रतिकिलो भाव… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… दिवसेंदिवस परिस्थिती बिकट…

April 2, 2023

मालेगावात गजबजलेल्या ठिकाणावरुन दुचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हिडिओ)

April 2, 2023

दंगलींमध्ये राज्य सरकारचाच सहभाग… आमचा मार्ग अडविण्यासाठीच दंगल… संजय राऊतांचा हल्लाबोल

April 2, 2023

बागेश्वर बाबांचे साईबाबांविषयी वादग्रस्त विधान… भाविकांमध्ये असंतोष… बघा काय म्हणाले ते…

April 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group