इंडिया दर्पण विशेष लेखमाला
जागो ग्राहक जागो
अशी होतेय एमआरपी कायद्यामुळे फसवणूक
आपण छापिल किंमत बघून वस्तू खरेदी करतो. आणि तीच खरी गोम आहे. छापिल किंमत काहीही टाकून आपल्याला अव्वाच्या सव्वा दरात वस्तू, पदार्थ विक्री केल्या जातात. यावर सरकारचे कुठलेही नियंत्रण नाही. मला आलेला हा अनुभवच खुप काही सांगून जातो. हे संपूर्ण जाणून घ्या आणि सतर्क व्हा..
पुण्याहून लेहला जाताना मी #GoAir च्या विमानात पेपर बोट डाळिंब रस मागवला, तेव्हा माझ्याकडून 250 मिली डाळिंबाच्या रसासाठी 150 रुपये आकारण्यात आले.
जेव्हा मी लेहला उतरलो तेव्हा मी ऑनलाइन शोध घेतला आणि फक्त 50 रुपयांमध्ये 200 मिलीलीटर पेपर बोट रस मिळत आहे. काही ऑनलाइन साइट्सवर तोच रस 45 रुपयांनाही उपलब्ध आहे. पेपर बोट हे उत्पादन प्रसिद्ध फळांचे रस पॅकिंग आणि विक्री कंपनी ही #Hector Beverages प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हरियाणा आणि म्हैसूर येथून पॅकिंग करून संपूर्ण देशात पुरवते.
सरकारच्या एमआरपी कायद्यातील त्रुटींमुळे डाळिंबाच्या रसाचा 250 मिलीचा पॅक 150 रुपयांना विकला जात आहे, तर 1000 मिली डाळिंबाच्या रसाचा पॅकही 150 रुपयांनाच विकला जात आहे. कंपनी पण सेम, त्यांना दिलेले लायसेन्स पण सेम मग एवढा फरक का? ऑनलाइन तपासल्यानंतर त्याच कंपनीच्या त्याच उत्पादनाच्या डाळिंबाच्या रसाचा एक लिटर पॅक 128 रुपयांना मिळतो ज्याची एमआरपी ही रुपये १५० आहे. एमआरपी कायद्यातील त्रुटी चा फायदा घेऊन जास्त किंमत छापून ग्राहकांना लुटण्याचा हा फंडा सर्वच कंपन्या करतात.
त्यामुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायत केंद्र सरकारला वारंवार विनंती करते की एमआरपी कायदा रद्द करावा, त्यात सुधारणा करावी किंवा प्रत्येक उत्पादनावर उत्पादन शुल्क छापण्यासाठी कायदा करून पारदर्शकता आणावी. आम्ही DGCA ला आवाहन करतो की सर्व एअरलाईन कंपन्यांना फक्त विमानात बाहेरील किमतीचीच उत्पादने विकण्याचा अधिकार देण्यात यावा.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत सर्व कंपन्यांना आवाहन करते की आपण एमआरपी कायद्यातील त्रुटींचा फायदा घेऊ नये आणि उत्पादनावर जास्त किंमत छापून ग्राहकांना लुटू नये. कित्येक उत्पादने ही बाजारात पण एमआरपी पेक्षा स्वस्त मिळतात पण काही दुकानदार विक्री ही एमआरपी वरच करतात तरी जास्तीची एमआरपी छापणे बंद करण्याचे आवाहन करतो. आपण सर्व उत्पादने वाजवी आणि रस्त दरात विकावीत.
आपणास काहीही मार्गदर्शन हवे असेल तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतशी अवश्य संपर्क करावा.
आमची वेबसाईट : www.abgpindia.com
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: *दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०*
अधिक माहितीसाठी
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286, श्री दिपक सावंत 9833398012
*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 9975712153
Column Jago Grahak Jago Juice Price Cheating by Vijay Sagar
Consumer Protection