इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मोठी मुलगी शानेल इराणी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान शनेलचा राजेशाही विवाह सोहळा जोधपूरमध्ये होत आहे. त्यासाठी ५०० वर्षे जुना खिवनसर किल्ला बूक करण्यात आला आहे. तिन्ही दिवस अगदी शाही पद्धतीने सर्व लग्नसंस्कार पार पडत आहेत.
खिंवसर किल्ला राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील खिवनसर गावात आहे. हा किल्ला ५०० वर्ष जुना आहे. जोधपूर आणि नागौरच्या मध्ये हा किल्ला आहे. हे थार वाळवंटाच्या पूर्वेकडील काठावर आहे. हा किल्ला १५२३ मध्ये राव करमजींनी बांधला होता. जोधपूरच्या राव जोधा यांचा तो आठवा मुलगा होता. १५व्या शतकात बांधलेल्या या किल्ल्याला एका बाजूला वाळवंट आणि दुसऱ्या बाजूला तलाव आहे. येथे तुम्ही दिवसा वाळवंट सफारीवर जाऊ शकता आणि रात्र ताऱ्यांखाली आरामात घालवू शकता. या किल्ल्यावरुन सोनेरी सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासारखा आहे. यामुळे या किल्ल्याला रोमँटिक वातावरण मिळते. किल्ल्याच्या आतही अनेक सुरेख विभाग आणि सुविधा आहेत.
खिवनसर किल्ल्याची वैशिष्ट्ये
या राजमहालात ७१ खोल्या आणि सुट आहेत. ४ फूड आणि बेव्हरेज आउटलेट्स आहेत. २ मेजवानीची आणि बैठकीची ठिकाणे आहेत. आलिशान झोपड्या असलेली १८ गावे आहेत. प्रत्येक गावात २ खाद्य आणि पेय दुकाने आणि १ मेजवानी आणि बैठकीचे ठिकाण आहे. जिम,स्विमिंग पूल, स्पा असे ऐशोआरामाच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
म्हणून हे स्थळ आहे खास
शनेल इराणी यांनी २०२१ मध्ये अर्जुन भल्ला यांच्यासोबत साखरपुडा केला होता. अर्जुनने जोधपूर आणि नागौर दरम्यान असलेल्या खिनवसार किल्ल्यावर शनेलला लग्नासाठी प्रपोज केले. म्हणूनच हे स्थळ वर-वधू दोघांसाठीही खास आहे. आता दोघेही याच किल्ल्यात लग्नाच्या गाठी बांधणार आहेत.
Minister Smriti Irani Daughter Wedding Ceremony Rajasthan