इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– बुलेटवर बाईक राईडचा थरार –
तरुण दादांच्या निधनानंतरचा प्रवास…
तरुण दादांना श्रद्धांजली वाहून आणि त्यांचा हेल्मेट विवेकच्या मागच्या सीटला बांधून आम्ही आता पुढचा प्रवास सुरू केला. आता आम्हाला लेह पासून दिस्कित मॉनेस्ट्री नुब्रा व्हॅली आणि हुंडर असा प्रवास करायचा होता. दिस्किट मोनेस्ट्रीला पोहोचल्यावर तिथला सौंदर्य बघून आम्ही सगळेजण हुरळून गेलो.

इंदिरानगर, नाशिक
इ मेल – [email protected]
जगातील सगळ्यात जुनी आणि मोठी बुद्धिस्ट मॉनेस्ट्री म्हणून नुब्रा व्हॅली येथील दिस्कीट मॉनेस्ट्री जगप्रसिद्ध आहे. तिथे बराच वेळ घालवल्यानंतर आणि तिथलं वातावरण दोन असल्यामुळे चांगलीच थंडी वाजू लागली. आज रात्री आमचा मुक्काम हुंदर येथे होता. सुंदरला जिथे राहण्याची सोय होती तिथे पोहोचल्यानंतर आम्ही सगळे खूप खुश झालो. कारण आज प्रवास सुरू केल्यानंतर पहिलीच डीजे पार्टी अरेंज करण्यात आली होती. आमच्या सगळ्यांचा थकवा आणि नैराश्य घालवण्यासाठी ऑर्गनायझर्सने केलेला तो प्रयत्न होता. आणि तो यशस्वी झाला. कारण त्या थंडीत तिथे भली मोठी शेकोटी पेटवण्यात आली होती. आणि डीजेची सोय. काय झकास पार्टी झाली आमची.
दुसऱ्या दिवशी सकाळी सियाचीन आर्मी कॅम्पला भेट द्यायची होती. कोणत्याही सिव्हिलियन्सला तेथे जाण्यास परवानगी नसताना फक्त फ्रीडम मोटरसाठी स्पेशल परवानगी देण्यात आली होती. हुंडर पासून सियाचीन आर्मी बेस 125 किलोमीटर लांब होता. तिथे जाऊन आर्मी सोबत लंच करून परत हुंदरला यायचं होतं. प्रवास सुरू झाला तशी उत्सुकता शिगेला लागली. कारण प्रचंड हाय सिक्युरिटी मध्ये आम्ही प्रवेश करत होतो. फोटो काढणे, ड्रोन उडवणे, कुठल्याही प्रकारची जीपीएस किंवा मोबाईल स्विच ऑन ठेवणे याच परवानगी नव्हती.
सियाचीन बेस्ट यांच्या जिथपर्यंत सामान्य माणूस जाऊ शकतो तेथे आम्हाला थांबवून आमचे कागदपत्र बघण्यात आले. त्यानंतर सर्व गॅजेट ऑफ करून जवळजवळ 40 किलोमीटर आत मध्ये लष्कराच्या सियाचीन बेस कॅम्प मध्ये आम्हाला नेण्यात आले. ते फिलिंग शब्दात सांगता येण्यासारखे नाही. कारण आजूबाजूला आर्मीचे बंकर्स, त्यांचे आणि युद्धाच्या वेळी त्यांच्याकडे सज्ज असलेले सगळे शास्त्र गोळे हे बघून माझा तर विश्वासच बसत नव्हता.
जेव्हा तिथे उणे तापमान जाते तेव्हा तिथल्या सैन्याला जमिनीच्या खाली बंकर मध्ये राहावे लागते. आणि ते आम्हाला दाखवण्यात आले. ते पाहून अतिशय त्रास झाला मनाला. आपल्या सुरक्षिततेसाठी जवानांनी स्वतःचे आयुष्य पणाला लावलेले बघून मनाला यातना होत होत्या. मध्ये मध्ये ट्रॅक वर लोड केलेले पाण्याचे मोठमोठाले कंटेनर्स दिसत होते. त्याची चौकशी केली असता असे समजले की, तिथे पाण्याचा कोणताही स्त्रोत नाही. त्यामुळे तेथील सैन्याला लेह मधून पाणी आणावे लागते. आणि ते फार जपून वापरावेही लागते.
आम्ही लष्कराच्या भोजनालयात आलो. फ्रीडम मोटरसाठी आजच्या शाही दावत देण्यात आली होती. छोले-भटूरे, मुगाचा शिरा आणि वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड्स, वॉव काय मस्त शाही दावत दिली सैन्याने आम्हाला. सियाचीन वॉर मेमोरियल मधल्या अमर जवान येथे आम्हाला घेऊन गेले. शहीद जवानांच्या स्मृती तेथे जपून ठेवण्यात आलेले आहेत. त्यांना मानवंदना देऊन आम्ही हुंदर साठी परत निघालो.
सौ दिपिका मोरे-दुसाने
इंदिरानगर, नाशिक
इ मेल – [email protected]
Special Article Series Bullet Bike India Ride by Deepika Dusane