मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव येथे पालकमंत्री दादा भुसे यांचे समर्थक माजी महापैर निलेश आहेर, सखाराम घोडके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कार्यकर्त्यांनी मोसमपुल येथील प्रभागात विकास निधी मिळत नसल्याचा जाब विचारण्यासाठी मोर्चा काढला. प्रभाग कार्यालयात प्रशासनाला धारेवर धरले. त्याचवेळी काही कार्यकर्त्यांनी प्रभाग ऑफीस मध्ये घुसून येथील सामानाची तोडफोड केली. प्रभागांमधील अनेक विकस कामांच्या निविदा काढल्या गेलेल्या नाही. त्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रभाग कार्यालयात राडा करत येथील सामानाची तोडफेड केली. जिल्हयाच्या पालकमंत्र्यांच्या समर्थकांनी तोडफोड केल्याने उलट-सुलट चर्चांना उधान आले आहे.