मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लुटारू गँगचा धुमाकूळ सुरुच असून अशीच एक घटना सोयगाव भागात घडली आहे. व्यापारी दिलीप पहाडे दुकान बंद करीत असताना तीन जणांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला करून रोख रक्कम लुटून पसार झाले. चोरट्यानी केलेल्या हल्ल्यात पहाडे जखमी झाले आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.