सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर ठाणगाव रस्त्यावर आशापुर ( देवीची खिंड) परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरसचा मृत्यू झाला. या वन्य प्राण्याचा मृत्यू झाल्यानंतर या अपघाताची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. त्यानंतर शवविच्छेदन सिन्नर येथील पशू वैद्यकीय अधिकारी यांनी केले. गेल्या काही दिवसापासून वन्यप्राणी हे मानवी वस्ती असलेल्या ठिकाणी येत आहे. त्यातून अशा अपघाताच्या घटनाही समोर आल्या आहे.