India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट… हा साक्षीदारही फितूर… आता काय होणार?

India Darpan by India Darpan
May 11, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव स्फोट प्रकरणातील आणखी एक साक्षीदार फितूर झाला आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) विनंतीवरून न्यायालयाने या साक्षीदाराला फितूर घोषित केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील फितुरांची संख्या ३७ झाली आहे.

मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित सुनावणीत सर्वाधिक कुठली गोष्ट आजपर्यंत गाजली असेल तर ती फितुरांची आहे. सुरुवातीला आरोपीला ओळखत असल्याची किंवा प्रकरणाबद्दल माहिती असल्याचे सांगणारे साक्षीदार ऐनवेळी फितूर होत आले. त्यामुळेच एवढ्या वर्षांच्या सुनावणीत आतापर्यंत ३७ साक्षीदारांना फितूर ठरविण्यात आले.

या प्रकरणातील मुख्य आरोपी व भारतीय जनता पार्टीच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना चांगल्याप्रकारे ओळखणाऱ्या साक्षीदारांने आपण त्यांना ओळखत नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला फितूर ठरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे एटीएसने यापूर्वी या साक्षीदाराचा जवाब नोंदविला होता. त्यावेळी त्याने आपण प्रज्ञा सिंह ठाकूर यांना ओळखत असल्याचे सांगितले होते. एवढेच नाही तर त्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी झालो होतो, असेही तो म्हणाला होता.

याशिवाय प्रज्ञा सिंह ठाकूर आणि फरार आरोपी रामजी कालसंग्रा यांच्यात स्फोटानंतर झालेले संभाषण आपण ऐकले आहे, असेही त्याने सांगितले होते. यामध्ये दोघेही स्फोटासाठी वापरण्यात आलेली प्रज्ञा सिंह ठाकूर यांची दुचाकी आणि शक्तीशाली स्फोट घडवण्यात अयशस्वी ठरल्याचे बोलत होते, असेही त्याने म्हटले होते. परंतु, आता त्याने आपण प्रज्ञा सिंह ठाकूर यांना ओळखत नसल्याचे म्हटले आहे.

स्वेच्छेने साक्ष नाही
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि कालसंग्रा यांना ओळखत नसल्याचे संबंधित साक्षीदाराने बुधवारी सांगितले. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी साक्षीदाराने आपण स्वेच्छेने साक्ष जबाब दिला नाही, असेही न्यायालयाला सांगितले. त्यानंतर एटीएसनेच त्याला फितूर घोषित करण्याची विनंती केली आणि न्यायालयाने त्याला फितूर जाहीर केले.

Malegaon Bomb Blast Case Witness Twist


Previous Post

आयपीएल गुजरात, चेन्नई मजबूत स्थितीत… या संघाचे आव्हान संपुष्टात… अशी आहे पॉईंट टेबलची स्थिती

Next Post

रामायण यात्रा दर्शन (भाग -१८)… अशी आहे चिंतामणी गुफा अर्थात किष्किंधा… श्रीरामाने येथेच केला वालीचा वध

Next Post

रामायण यात्रा दर्शन (भाग -१८)... अशी आहे चिंतामणी गुफा अर्थात किष्किंधा... श्रीरामाने येथेच केला वालीचा वध

ताज्या बातम्या

सुनिता धनगर

अखेर शिक्षण विभागाला जाग लाचखोर सुनीता धनगर हिच्यावर केली ही कारवाई

June 9, 2023

ना मंत्री, ना लवाजमा.. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्येचा विवाह… हा आहे त्यांचा जावई

June 9, 2023

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

June 9, 2023

उर्फी जावेद करणार या आजोबांचा महिन्याचा खर्च; कोण आहेत ते?

June 9, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

शिक्षण विभागाचा आणखी एक सावळा गोंधळ; आता गणवेशावरुन काढले हे आदेश

June 9, 2023

धक्कादायक! इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ चालवला… खलिस्तानी समर्थकांचे कॅनडात कृत्य… सर्वत्र संताप

June 9, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group