इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीचा मंत्रिमंडळाचा फॅार्म्युला ठरला असून भाजपला २५ मंत्रिपद, शिवसेना शिंदे गटाला १२ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला ८ मंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेला ९ कॅबिनेट व ३ राज्यमंत्री, तर अजित पवार गटाला ६ कॅबिनेट व २ राज्यमंत्रीपद मिळणार असल्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.
राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा हा ५ डिसेंबर रोजी ५ वाजता आझाद मैदानावर पार पडणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबनकुळे यांनी दिली. त्यानंतर मंत्रिमंडळाबाबत चर्चा सुरु झाली. दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठकीतच हा निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. अद्याप ही माहिती आज अधिकृतपणे देण्यात आलेली नाही.
दरम्याना महायुतीच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिततीत राहणार आहे. महाराष्ट्रचा मुख्यमंत्री कोण होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले असून येत्या काही तासात ते कळेल असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.