इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा हा ५ डिसेंबर रोजी ५ वाजता आझाद मैदानावर पार पडणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबनकुळे यांनी दिली. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घडामोडी सुरु होत्या. दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर ही माहिती आज अधिकृतपणे देण्यात आली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिततीत राहणार आहे. दरम्यान महाराष्ट्रचा मुख्यमंत्री कोण होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी भाजपच्या गोटात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान नवी दिल्लीत महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक झाल्यानंतर शुक्रवारी महायुतीची बैठक मुंबई होती. पण, ही बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर ही बैठक अजून झालेली नाही. अद्याप भाजप गटनेता निवड झालेला नाही. दरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळगावी गेले आहे.
महायुतीच्या नेत्यांची बैठक
गुरुवारी झालेल्या बैठकीत महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याचबरोबर या बैठकीत खातेवाटपावर चर्चा झाली. कोणत्या पक्षाला कोणत्या खात्याचं मंत्रिपद द्यावं, ते ठरवण्यात आले आहे. .