India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

महाशिवरात्रीला या मंदिरात बेल, फुल अर्पण करण्यासह जलाभिषेकास परवानगी; सरकारचा निर्णय

India Darpan by India Darpan
February 17, 2023
in राज्य
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरात उद्या शनिवारी महाशिवरात्री साजरी होत आहे. मुंबईतील बाबुलनाथ मंदिर येथे महाशिवरात्री साजरी करण्याबाबत स्थानिक आमदार व राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात मंदिर ट्रस्ट व भाविक प्रतिनिधींची बैठक झाली. यंदा महाशिवरात्रीला मंदिरातील शिवलींगावर बेल व फुल अर्पण करण्यासह जलाभिषेक करण्यास परवानगी देण्याचा सुवर्णमध्य या बैठकीमध्ये काढण्यात आला. बैठकीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन ठक्कर, विश्वस्त प्रदीप श्रॉफ यांच्यासह भाविकांचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोना काळात मंदिरात पूजाविधीबाबत प्रतिबंध लावण्यात आले होते. तसेच आयआयटीच्या एका अहवालानुसार शिवलींगावर हळदी, कुंकू किंवा इतर पूजा साहित्य वाहिल्याने, चंदनाचा लेप लावल्याने शिवलींगाची झीज, नुकसान होत असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. याबाबत भाविकांमधून पूजाविधी परत सुरु करण्याबाबत मागणी होती. या मुद्द्यावर स्थानिक आमदार व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंदिर विश्वस्त व भाविक प्रतिनिधींची आज मंत्रालयात बैठक घेतली. महाशिवरात्रीला बेल व फुल अर्पण करण्यासह जलाभिषेक करण्यास परवानगी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, महाशिवरात्रीला बाबुलनाथ मंदिर येथे मंदिर विश्वस्तांसह पोलीस प्रशासन आदी सर्वजण भाविकांच्या मदतीसाठी असतील. भाविकांनी सहकार्य करावे. शिवलींगाची झीज, नुकसान होणार नाही यादृष्टीने काळजी घ्यावी. भाविकांच्या भावनाही महत्त्वाच्या आहेत. मंदिर आपल्या सर्वांचे आहे. त्याची सुरक्षाही आपली सर्वांची जबाबदारी आहे. सर्वांनी महाशिवरात्री उत्साहात साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

Mahashivratri Flower Abhishek Permission in This Temple


Previous Post

देशातील पहिली पॉड टॅक्सी या शहरात धावणार; अशी राहणार तिची वैशिष्ट्ये

Next Post

बाहुबली इफेक्ट! अभिनेता प्रभास पूर्वी घ्यायचा एवढी फी…. आणि आता घेतो चक्क एवढी फी…

Next Post

बाहुबली इफेक्ट! अभिनेता प्रभास पूर्वी घ्यायचा एवढी फी.... आणि आता घेतो चक्क एवढी फी...

ताज्या बातम्या

मालेगावमध्ये पोलिस शिपाई एसीबीच्या जाळ्यात; यासाठी मागितले ४ हजार

June 6, 2023

अमृता फडणवीस पुन्हा एकदा ट्रोल; आता हे आहे कारण…

June 6, 2023

आज विरोधक सक्रीय होतील; जाणून घ्या बुधवार, ७ जून २०२३चे राशिभविष्य

June 6, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – ७ जून २०२३

June 6, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – लायब्ररी

June 6, 2023

अतिखोल अरबी समुद्रातील अति तीव्र चक्रीवादळ… महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

June 6, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group